काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता अधिकच रंजक होत आहे. राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंग आणि अशोक गेहलोत यांच्या समर्थकांच्या संभाव्य बंडाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते आज उमेदवारी अर्ज भरतील.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मध्य प्रदेश युनिटचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ ही निवडणूक लढवतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आपण मध्य प्रदेश सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारलेल्या प्रश्नावरत्यांनी सांगितले, मला मध्य प्रदेश सोडायचा नाही, निवडणुकी साठी 12 महिने बाकी आहेत, सध्या माझे संपूर्ण लक्ष मध्य प्रदेशवर आहे, आणि मला माझे लक्ष मध्य प्रदेशातून हटवायचे नाही.
राजस्थानमधील राजकीय गोंधळावर कमलनाथ यांनी सांगितले की, मी स्वत: अशोक गेहलोत जी यांच्याशी बोललो आहे, काही लोकांनी अनुशासनाचा भंग केला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यवेक्षकांनी आपला अहवाल दिला आहे. केंद्र सरकारने पीएफआयबाबत केलेल्या कारवाईच्या प्रश्नावर कमलनाथ म्हणाले, जर ते दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे, दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे पुरावे आढळले, तर पीएफआय किंवा कोणत्याही संघटनेवर कठोर कारवाई केली जाईल.
टिप्पणी पोस्ट करा