रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.



भारतीय संघाचा भूतपूर्व सदस्य रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हि घोषणा त्याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केली आहे 

रॉबिन उथप्पाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मी 20 वर्षांपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. मला भारत आणि माझे राज्य कर्नाटकसाठी खेळण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. माझा प्रवास खूप सुंदर होता. काही चढ-उतारही आले, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतो. त्यामुळेच मी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.' उथप्पाने पुढे लिहिले की, 'मी मुंबई इंडियन्स, आरसीबी, पुणे आणि राजस्थानचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. तसेच कोलकाता आणि चेन्नईचा संघ माझ्यासाठी खूप खास आहे. ज्याने आयपीएल दरम्यान माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली.'

उथप्पाने 15 एप्रिल 2006 रोजी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर उथप्पाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 14 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याच वेळी, तो आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. आता तो क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅट मध्ये  खेळणार नाही.

1/Post a Comment/Comments

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने