काही वर्षांपासून शेतकरी हा केवळ पारंपरिक शेती करत आहे. शेतीतून हवा तसा नफा मिळत नाही, असे शेतकरी नेहमीच सांगत म्हणत आहेत. आजही अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून नवीन काही करण्यास कचरतात, त्यामुळेच त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकत नाही, असे कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशाच झाडाच्या लागवडीची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांच्या शेतीने अनेकांना करोडपती बनवले आहे. हे झाड म्हणजे लालचंदन.
अनेक गोष्टींमध्ये चंदनाचा वापर केला जातो. त्याच्या लाकडापासून फर्निचर, शिल्पांसह अनेक सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात.तसेच झाडाची पावडर सौंदर्य उत्पादने तयार करण्यासाठी, शरबत तयार करण्यासाठी वापरली जाते. चंदनाच्या लाकडाचा वापर पूजेतही केला जातो. म्हणजेच चंदनाला वर्षभर मोठी मागणी असते. त्यामुळे त्याचे दर नेहमीच चढे असतात. म्हणूनच जर तुम्ही चंदनाची लागवड केली तर त्यातून तुम्हाला करोडोंचाच फायदा होऊ शकतो.
चंदनाचे चार प्रकार आहेत. त्यापैकी एक लाल चंदन आणि दुसरे पांढरे चंदन, तिसरे मोर आयर चौथे नाग चंदन. पांढऱ्या चंदनाच्या तुलनेत लाल चंदनाची मागणी आणि किंमत खूप जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाल चंदनाच्या लागवडीशी संबंधित माहिती देणार आहोत. लाल चंदनाला अनेक नावांनी संबोधले जाते. शास्त्रज्ञ त्याला Pterocarpus santalinus म्हणतात. याशिवाय याला रतांजली, रक्तचंदनम, अट्टी, शेन चंदनम, लाल चंदन, रुबी अशा अनेक नावांनी ओळखले जाते.
चंदनामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेचे आजार बरे करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. डाग आणि पिंपल्ससाठी प्रत्येक घरात चंदनाचा वापर केला जातो. इतकेच नाही तर सूर्यप्रकाशामुळे जळलेली त्वचा देखील यामुळे बरी होते. यात जखमा लवकर भरून येण्याचे गुणधर्म आहेत. किरकोळ जखमांवर आणि ओरखड्यांवर चंदनाची पेस्ट लावल्याने लवकर आराम मिळतो. कर्करोग आणि पचनाचे आजार टाळण्यासाठीही लाल चंदनाचे सेवन केले जाते.
भारतापेक्षा परदेशात लाल चंदनाला जास्त मागणी आहे. सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये याला मागणी आहे, परंतु चीनमध्ये लाल चंदनाला सर्वाधिक मागणी आहे. याची शेती करून तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करू शकता. एकदा तुम्ही लाल चंदनाची रोपे लावली की तुम्हाला किमान 10 ते 15 वर्षे वाट पहावी लागेल. तोपर्यंत रोपांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. झाडाचा चांगला विकास होऊन त्याचे झाड झाले की त्याची किंमत लाखात होते. त्यांची लागवड करण्यापूर्वी तुम्हाला सरकारकडून परवाना घ्यावा लागतो.
कोरडे उष्ण हवामान लाल चंदनाच्या लागवडीसाठी योग्य आहे. योग्य निचरा व्यवस्था असलेल्या चिकणमाती जमिनीत मातीचे पीएच मूल्य 4.5 ते 6.5 दरम्यान असने गरजेचे आहे. लक्षात ठेवा लाल चंदन हे वालुकामय आणि बर्फाळ भागात लागवड करता येत नाहीत. याची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम काळ हा मे ते जून दरम्यान आहे. लावणीपूर्वी शेत तयार करावे लागते. लागवडीच्या आधी दोन ते तीन वेळा चांगली नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी लागते. यानंतर शेतात ४ मीटर अंतरावर ४५ सेमी रुंद व तितकेच खोल खड्डे करावेत. त्यांना शेणखताने भरावे आणि नंतर पुनर्रोपण करा. जेथे रोपे लावली जात आहेत, तेथे पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी कारण जास्त पाण्यामुळे त्यांचे नुकसान होते.
या झाडांना आठवड्यातून फक्त दोन ते तीन लिटर पाणी लागते. त्यामुळेच ही बाब लक्षात घेऊन सिंचन व्यवस्था करावी. लावणीनंतर सिंचन आवश्यक आहे. त्यानंतर हंगामानुसार झाडांना पाणी दया. तसेच पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व पिकांप्रमाणे, चंदनाच्या झाडांभोवती तण जमा होऊ देऊ नये. त्यामुळे झाडांची वाढ थांबते. त्यामध्ये पाने खाणाऱ्या कीटकांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच कीड नियंत्रणाची फवारणी आवश्यक आहे. दहा ते पंधरा वर्षांनी झाडे तोडता येतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या झाडांमध्ये इतकी वर्षे इतर कोणतेही पीक घेऊ शकता. गुंतवणुकीचे बोलायचे झाले तर इतक्या वर्षांच्या संगोपनावर लाखो रुपये खर्च होतात, मात्र झाडे विकून करोडो रुपये कमावले जातात. दरवर्षी चंदनाच्या किमती वाढत असतात. सद्या त्यांची किंमत 30 हजार ते 40 हजार रुपये प्रति किलो आहे. यावरून तुम्ही किती नफा कमवू शकता याचा अंदाज लावा.
टिप्पणी पोस्ट करा