आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत हर दिन हर घर आयुर्वेद उपक्रमाची सुरूवात.

 

        ब्युरो टीम:  आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) ने 12 सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिवस 2022 या विशेष उपक्रमाची सुरूवात केली असुन ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे. 12 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या सहा आठवड्याच्या कालावधीत चालणाऱ्या आयुर्वेद दिनाच्या विशेष उपक्रमाच्या उद्घाटन आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई कालुभाई, सचिव वैद्य राजेश कोटेचा, विशेष सचिव पी.के. पाठक आणि राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोग (NCSIM) चे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी हे दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थित होते. 

        याप्रसंगी बोलताना सोनवाल म्हणाले, “ हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आयुर्वेद कल्पना पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे. हा उपक्रम तेंव्हाच यशस्वी होईल जेंव्हा आपण भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत जाऊ,आणि म्हणूनच आगामी आठवड्यांमध्ये आयुर्वेदाचा संदेश समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना आयुर्वेदाबाबत अधिकाधिक माहिती देण्यावर आपण भर देऊ. ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ या उपक्रमा मार्फत प्रत्येक घरात ‘संपूर्ण आरोग्यासाठी आयुर्वेद’ याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल. हा उपक्रम आपला देश निरोगी आणि मजबूत बनण्यास सहाय्यक ठरेल.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने