रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिकणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये झाला मोठा बदल


ब्युरो टीम: भारतातील प्रसिद्ध रिलायन्स समूहाच्या मालकी असलेलय मुंबई इंडियन्स च्या फ्रँचायझीने आपला विस्तार वाढवत विदेशातील संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिका लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. भारतातील आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
       मुंबई इंडियन्स च्या फ्रँचायझीने नवीनच विकत घेतलेलया दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमधील टीमला 'MI cape town' आणि युएईच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० लीगमधील टीमला 'MI Emirates' अशी नावे दिली आहेत. 
 मुंबई इंडियन्स हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट ब्रँड ठरला आहे  मुंबई इंडियन्स 'वन फॅमिली ऑफ टीम्स' मध्ये, नैतिकता, मूल्ये आणि शिक्षण यावर सातत्य ठेवेल. या संरचनेच्या उभारणीचा एक भाग म्हणून मुंबई इंडियन्स फॅमिलीचे सखोल ज्ञान असलेल्या दोन दिग्गज आहेत., अशा महेला जयवर्धने आणि झहीर खान यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
          २०११च्या विश्वचषक स्पर्धेत संयुकरित्या सार्वधिक विकेट घेणारा झहीर खानची ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भौगोलिक परिसरातील खेळाडूंचा विकास, ग्रूमिंग याबाबत सेशन घेणे, यूएई आणि केपटाऊनमधील भौगोलिक परिस्थिती समजून घेत तेथील खेळाडूंची सेशन ठरवणे, हे महत्त्वाचे काम झहीर करेल. तसेच मुंबई इंडियन्सच्या सर्व संघांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका झहीर बजावेल.
    महेला जयवर्धने यांची ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी यासह क्रिकेट ऑपरेशन्सचे नेतृत्व देण्यात आले आहे. सपोर्ट स्ट्रक्चर्स, संघाच्या मुख्य प्रशिक्षकांसोबत जवळून काम करणे, समन्वय सुनिश्चित करणे, क्रिकेटचा एक सातत्यपूर्ण ब्रँड आणि मुंबई इंडियन्सने सेट केलेल्या सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी करणे, अशी एकंदरीत भूमिका महेला जयवर्धनेची असेल.
     रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले.की  महेला आणि झहीर हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत. हे आमच्या जागतिक कोअर टीमचा भाग झाल्याचा आम्हाला आनंद आहे. मालक विश्वास आहे हे जागतिक स्तरावर आमच्या सर्व संघांद्वारे समान प्रवाह सुनिश्चित करण्यात सक्षम होतील आणि जगभरातील क्रिकेट इकोसिस्टममध्ये बदल घडवून आणतील
     "मी ही नवीन भूमिका स्वीकारण्यास तयार आहे आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल श्रीमती नीता अंबानी आणि आकाश यांचे आभार मानतो. एक खेळाडू आणि कोचिंग टीम सदस्य म्हणूनमुंबई इंडियन्स माझ्यासाठी घर आहे, आणि आता आम्ही नवीन प्रवास सुरू करत असताना, कुटुंबात सामील होऊ पाहणार्‍या नवीन क्षमतांचा शोध घेण्यासाठी मी जागतिक नेटवर्कमधील सर्व भागधारकांसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे," असे झहीर खान म्हणाला.
            जयवर्धने म्हणाले की एमआयच्या जागतिक क्रिकेट ऑपरेशन्सचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या नेतृत्वामुळे आणि मार्गदर्शनामुळे मुंबई इंडियन्स जागतिक स्तरावर सर्वात महत्त्वाची क्रिकेट फ्रँचायझी बनली आहे आणि संघाची जागतिक स्तरावर वाढ होत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे. क्रिकेटचा एक मजबूत एकसंध जागतिक ब्रँड तयार करण्यासाठी मी या नवीन जबाबदारीकडे पाहत आहे" असे जयवर्धने निवेदनात म्हणाला.
.........





0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने