का नाकारली महानगर पालिकेने शिवसेना (ठाकरे गट ) यांना दसरा मेळाव्याला परवानगी.

 



शिवसेनेत दसरा मेळाव्याचे स्थान हे खुप महत्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग झाला होता. आजपर्यंत शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळणे, हा केवळ औपचारिकतेचा भाग होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील एक मोठा गट फोडल्याने पहिल्यांदाच शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या पाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्याने पेच निर्माण झाला आहे. यातच मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. 

मुंबई महापालिकेने आमदार सदा सरवणकर यांना लिहलेल्या पत्रात कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारली आहे पत्रात उप आयुक्त परिमंडळ २ यांनी लिहले आहे  'मला प्राप्त अधिकारांच्या अनुषंगाने एखाद्या मैदानाच्या सार्वजनिक वापरास परवानगी देणे पुर्वी पोलीस विभागाचे अभिप्राय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक , शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई यांचे क्र. जा.क्र .6438 / 2022 दि. 21.09.2022 नुसार पोलीस विभागाचे अभिप्राय प्राप्त झालेले असून त्यात खालील प्रमाणे नमूद केलेले आहे . " दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो." 

त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने मला उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे . महानगरपालिकेने परवानगी नाकारण्याच्या आधीच परवानगी बाबत शिवसेना (ठाकरे गट )  यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत  न्यायालयाने उद्या सुनावणी ठेवली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने