नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून २५व्या वर्षी खासदार झालेला व्यक्ती होणार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष;सोनिया गांधीच्या निर्णयानंतर चर्चेला उधाण

ब्युरो टीम: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्याकडून मध्य प्रदेशची जबाबदारी काढून घेण्यात आली असून जेपी अग्रवाल यांना त्यांच्या जागी प्रभारी बनवले आहे.

त्यामुळे मुकुल वासनिक यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

      काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी पुन्हा जोर पकडला आहे. त्यातच सोनिया गांधींनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मुकुल वासनिक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

  राहुल गांधी यांनी अध्यक्षपद घेण्यास नकार दिला. अशोक गेहलोत हे अध्यक्षपद घेण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे मुकुल वासनिक ही जबाबादारी सांभाळू शकतील का याची चाचपणी सध्या सुरू आहे.


कोण आहेत मुकुल वासनिक?

     मुकुल वासनिक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.मुकुल वासनिक 2009 साली नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी बुलढाणा मतदारसंघातूनही ते तीन वेळा खासदार राहिले आहेत. 1984 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी संसदेची पायरी चढणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले होते.a सध्या ते राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने