'आागामी निवडणूक एकत्रित लढण्या जाऊ शकतात - शरद पवार


ब्युरो टीम:आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पुढील निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवली जाण्याची शक्यता आता बळावली आहे.
'आागामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.' ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत पवार म्हणाले की, 'भाजपाने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत.
        महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्येही सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे असंही ते पुढे म्हणालेत.
       भाजपसोबतची युती सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच कौतुक केलं आहे. नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला, असंही पवार म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने