माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जात आहे.

 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत होणाऱ्या सरस्वतीच्या पुजेबात वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. दरम्यान आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले “कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. मी सुद्धा हिंदू आहे. नाशिकमध्ये अनेक मंदिरांची कामे मी केली आहेत. कुंभमेळाव्यसाठीही आम्ही भरपूर कामे केली आहेत. माझ्या घरातही देवदेवतांची पूजा होते. आम्ही सर्वच देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही कुटुंबात कोणत्या देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, शाळेत शाळेत महापुरुषांचे फोटो बाजूला सारून देवीची पूजा करणं योग्य नाही, एवढचं माझं म्हणणं होतं”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

"छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, अण्णसाहेब कर्वे आदी महापूरूषांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. यावेळी त्यांना विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थिती ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडी केली त्यांची पूजा करायची सोडून आपण सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळे देवीच्या जागी महापुरुषांची पूजा करावी एवढं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने