आ. रोहित पवार शेतकऱ्यांच्या मदतीला धावले, जनावरांच्या लसीकरणासाठी केला असा प्लॅन


        ब्युरो टीम: पशुपालन हे शेतकरी वर्गाचे मोठे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, आता शेतकऱ्यांचे पशुधन हे लम्पी व्हायरसचा (Lumpy virus) प्रादुर्भाव वाढत असल्याने संकटात आले आहे. हा व्हायरस राज्यातील अनेक भागात कहर करत आहे.   गायींवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रार्दुभाव होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार धावून आलेत. या मतदारसंघातील  गोवंशीय जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पवार यांनी नियोजन केले आहे.

        गेल्या तीन दिवसांपासून सरकारी व खासगी डॉक्टर आणि सातारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या मदतीने कर्जत-जामखेड मतदारसंघात वेगाने लसीकरण सुरूय. यामुळं 100 टक्के लसीकरण झालेला कदाचित कर्जत-जामखेड हा राज्यातील पहिला मतदारसंघ ठरेल, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटर दिली आहे. मतदारसंघात जनावरांमधील लम्पी या साथीच्या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी 'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून १ लाख लसी दिल्यानंतर गरज लागल्याने आणखी 50  हजार लसी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळं आता एकूण दिड लाख जनावरांना ही लस मोफत देण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.



        दरम्यान,  लम्पी व्हायरसचा माणसाला कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. तज्ज्ञांच्या मते, या व्हायरसमुळे जनावरांना झालेल्या जखमांना कडुलिंब किंवा हळद आणि तुपाची पेस्ट लावल्यास जखमा भरतात, आणि या आजाराने ग्रस्त गुरे 1 आठवडा ते 10 दिवसांत बरी होऊ शकतात. परंतु यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय लसीकरण आहे. लसीकरणामुळे व्हायरसचे संक्रमण वेगाने थांबवता येते. दुसरीकडे लम्पी व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या व्हायरसचा कहर थांबवण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.  मात्र, रोहित पवार यांनी सरकारच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः. पुढाकार घेत शेतकऱ्यांना मदत सुरू केली आहे.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने