पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीत वर्णी.

 


प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजप (BJP Maharashtra) प्रदेश अध्यक्ष  चंदशेखर बावनकुळे यांनी आज राज्याच्या सरचिटणीसपदी काही नियुक्त्या केल्या आहेत. यात ठाण्याच्या माधवी नाईक, रायगडचे विक्रांत पाटील, अकोल्याचे रणधीर सावरकर, संभाजीनगरचे संजय केणेकर यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे.  परंतु यातील एक महत्वाचे नाव आहे ते म्हणजे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ ( Murlidhar Mohol )  

राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  येऊ घातल्या आहेत. यात पुणे महापालिकेची देखील निवडणुक होणार आहे पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या निवडणुकीत भाजपने येथे सत्ता मिळवली होती. आता ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहळ यांना बळ दिल्याचे बोलले जात आहे. पुणे शहराचे अभ्यासु नेते अशी त्यांची ओळख असुन  येणाऱ्या काळात त्यांना  यापेक्षा हि मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आता भाजपमध्ये आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने