कर्णधार आरोन फिंच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

ब्युरो टीम: ऑस्ट्रेलियाचा संघाचा कर्णधार आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आगामी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

      "मी खेळलेल्या प्रत्येकासह अनेक लोकांचा मला आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि साथ दिली. मी सर्वांचे आभार मानतो", असे फिंचने निवृत्ती जाहीर करताना म्हटले.

       ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या (11 सप्टेंबर) तिसऱ्या एकदिवसीय सामना आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. दरम्यान, फिंच मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. फिंचच्या फलंदाजीतून धावांची अपेक्षा असताना त्याची चांगली खेळी होत नाही आहे.

       आरोन फिंचने निवृत्ती जाहीर करताना आपली भुमिका स्पष्ट केली. त्यावेळी फिंचने "काही आठवणींसह हा एक प्रवास आहे. अनेक अद्भूत एकदिवसीय संघांचा भाग होण्यासाठी मी भाग्यवान आहे. मी खेळलेल्या प्रत्येकासह अनेक लोकांचा मला आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि साथ दिली. मी सर्वांचे आभार मानतो", असे फिंचने म्हटले.

         2013 मध्ये आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आरोन फिंचने त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये फिंचने 39.14 च्या सरासरीने 5401 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 शतकांचा सामावेश आहे.

     ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिक पॉन्टिंगने सर्वाधिक 29 वेळा शतक ठोकले आहे. तसेच, डेव्हिड वार्नर आणि मार्क वॉ यांच्या नावावर प्रत्येकी 18-18 शतकांची नोंद आहे.

        फिंच रविवारी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 146 वा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर, कर्णधार म्हणून हा त्याचा 54 वा एकदिवसीय सामना असणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने