चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार , नितीन गडकरींनी सांगितला मेगा प्लॅन


ब्युरो टीम : पुण्यातील चांदणी चौकात  होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी  यांनी काही महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे. तर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी  फोडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत येथील पूल पाडण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. वेळेत काम झाल्यास नव्या पुलाचे उद्घाटन लवकर करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौक परिसरास भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि पुण्याशी जोडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामासंदर्भात महामार्ग आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठकही त्यांनी घेतली.

एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार

          पुण्यातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन गडकरींनी सांगितला आहे. चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अंतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करारदेखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुणे विभागात लॉजिस्टिक पार्कसाठी जी जमीन अधिग्रहण करावे लागते, त्यासाठी NHAIतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑफर दिली आहे.

दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती

         ठिकठिकाणी NHAIच्या बाजूला लॉजिस्टिक पार्कसाठी जर जागा दिली तर मदत होणार आहे. केंद्रातर्फे दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पुण्याजवळ अशा प्रकारची जागा मिळाल्यास ती या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरले, असे ते म्हणाले. नाशिक फाटा येथेदेखील दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्यासाठी विचार चालू असल्याचे गडकरी म्हणाले. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी, असे ते म्हणाले आहेत. पुणे विभागात NHAIच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी मनपाने जागा दिली तर दोन लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने