मुंबई पाठोपाठ भगवानगडावरील दसरा मेळावा आला चर्चेत, या मुंडे म्हणाल्या...


        ब्युरो टीम : मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आलेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता महाराष्ट्र राज्यातील महत्वाचा असणारा भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

        भगवान गडावरील मेळाव्याला ५० वर्षाची परंपरा आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे येथे ३५ वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी हा दसरा मेळावा घेतला होता. मात्र, २०१६ मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी मेळावा घेण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. २०१७ मध्ये त्यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. त्यातच आता भगवानगडावर दसरा मेळावा घेणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय.

    नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे ? 'उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीदेखील स्पर्धेत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे. मी गेल्या २६ वर्षांपासून वंजारी समाजाची, मुंडे घराण्याची सून आहे. मीदेखील या स्पर्धेत असून, दसरा मेळाव्याला भगवान गडावर माझं स्वागत करावं, अशी महाराष्ट्राला विनंती आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडेचा त्या दिवशी वाढदिवस आहे. त्यामुळे तिथे दसरा मेळावा घेणारच.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने