नावात काय आहे ? पाळीव कुत्र्यांच्या.


 

कुत्र्यांची नावे (name of dog) ही एक मजेशीर गोष्ट आहे. या बाबत प्रत्येक देश किवां तेथील संस्कृती याचे अलिखित असे कुत्र्यांच्या योग्य प्रकारच्या नावांबद्दलचे नियम असतात, मग ते कोणत्याही जातीचे कुत्रे असोत किंवा कोणत्याही वंशावळीचे कुत्री असोत काहींना लांबलचक, खानदानी नावे असतात जी विशिष्ट अक्षराने सुरू होतात. 

जुन्या दिवसांमध्ये भारतीय कुत्र्यांना सहसा नावे दिली जात होती जी त्यांच्या रंगाचे किंवा वर्णांचे वर्णन करतात. ग्रामीण भागातील घरे आणि शेतात तुम्हाला पांढऱ्या हे नाव आढळले असेल, तसेच काळ्या, तांबड्या, असे कॉमन नाव देखील बऱ्याच ठिकाणी ऐकली असतील ग्रामीण भागात काळ्या हे नाव बऱ्याच ठिकाणी वापरलेले असते हि नावे त्या कुत्र्यांच्या रंगावरून दिलेली असतात.  

एक संशोधनानुसार साधारणपणे काही नावे हि भारतीय पाळीव कुत्र्यांकरिता सर्वात जास्त वापरली जातात, ही सामान्य भारतीय कुत्र्यांची नावे काही परदेशी शब्दांवरून घेतली गेली आहेत. उदाहरणार्थ, जस्मिन ( हे नाव कुत्री साठी वापरतात), टायगर हे देखील बरेच ठिकाणी वापरले जाणारे नाव आहे, भालू किंवा मोगली हे नाव जंगल बुक या सिरीयल मधुन घेतलेले नाव आहे तसेच यातुन येणारे अजून एक नाव म्हणजे भागिरा.  

आजकाल पशुवैद्य आणि कुत्र्याचे तज्ञ असे सुचवतात की कुत्र्यांच्या मालकांनी त्यांना नाव देताना साधारण संकेत पाळण्यास हरकत नाही पण आपण पाळलेल्या कुत्र्यांच्या ब्रीड प्रमाणे त्याला शोभेल असे नाव दिलेले कधी पण चांगले - म्हणजे, तुमच्या पग जातीच्या कुत्र्याला शहेनशहा म्हणू नका. हा चांगला सल्ला आहे, जसे 'छोटा पॅक' हे नाव पग जातीच्या कुत्र्याला योग्य नाव वाटते. 

तसेच तुम्ही तुमच्या कुत्र्याचे नावे सोन्या, बबड्या ठेवू नये आणि नंतर त्याच्यावर ओरडू नये, प्रत्येक वेळी तो काहीतरी चूक करतो आणि तुम्ही त्याचे नाव घेऊन ओरडला तर बाकीच्यांना वाटते कोणा मुलांवरच तुम्ही रागवत आहात. कुत्र्याला व्यक्तींची नवे देणे टाळावीत त्यांना तुलनेने मूळ नाव देणे देखील चांगले आहे. अन्यथा, आपण बाहेर कॉल तर आणि समोरच्या व्यक्तीचे आणि तुमच्या कुत्र्याचे नाव सारखे असेल तर तुमचा कुत्रा धावत तुमच्या जवळ येईल याच कारणास्तव कुत्र्यांना व्यक्तींची नावे न देण्यास सल्ला देतात. तसेच तुम्ही तुमच्या कुत्र्यासोबत बागेत बसलेले आहेत जेव्हा तुम्ही कुत्र्याला सोन्या, बबड्या आणि राजा असे हाक मारता तेव्हा अशा नावाची लहान मुले उद्यानातून तुमच्याकडे येऊ शकतात. यामुळे त्यांच्या पालकांना देखील नक्कीच आनंद होत नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने