भारताच्या आरोग्य व्यवस्थेने मृत्यूदर कमी करण्यात ही यश संपादन केले: डॉ भारती पवार

 


आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती पवार यांनी एम्स इथे “एम्स आज आणि 2047 साठीची दूरदृष्टी” या विषयावर आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी “भारतातील आरोग्य चिकित्सा व्यवस्थेने केवळ आजारांचे निदान आणि व्यवस्थापन सुविधा पुरवण्यात उत्तम कार्यक्षमता मिळवलेली नाही, तर, मृत्यूदर कमी करणे आणि आजार बरे करण्याचे प्रमाण वाढवण्याचे यशही संपादन केले आहे,” असे गौरवोद्गार, काढले.

संशोधन क्षेत्रात, एम्सचा देशातल्या 10 प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रुग्णांची शुश्रूषा करण्या सोबतच, संशोधन करण्याची सुविधा असणारी एम्स ही एकमेव संस्था आहे, असेही भारती पवार पुढे म्हणाल्या. राष्ट्रीय क्रमवारी आराखडा संस्था- एनआयआरएफ ह्या शिक्षण मंत्रालयाच्या  वैद्यकीय संस्थांच्या क्रमवारीत, एम्स गेली पाच वर्षे सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे, ही देखील ह्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे,असे पवार म्हणाल्या, हेच स्थान संस्थेने भविष्यातही कायम राखावे असे त्यांनी सांगितले. “यशस्वी होणे, हा प्रवास आहे, ते साध्य नाही. आपल्याला पुढेही संस्थेचा हाच दर्जा कायम राखण्यासाठीच नव्हे, तर यशाची नवनवी उद्दिष्टे ठेवून ती गाठण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत,” असेही त्या म्हणाल्या.

नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या, 67 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात एम्स या संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आले. यावेळी एम्स नवी दिल्लीचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास आणि प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने