शेतकऱ्यांनो पीएम किसान सन्मान निधी जमा झाला का? तपासा तुमच्या खात्याची स्थिती.

 


शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असुन. या योजनेचा 12वा हप्ता या महिन्यात सप्टेंबरमध्ये कधीही येऊ शकतो. लाभार्थी शेतकऱ्यांनी हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी काय करावे हे तुम्हला या लेखात आम्ही सांगणार आहोत. तसेच कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी तुम्ही काही  हेल्पलाइन नंबरवर देखील संपर्क साधू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी केंद्र सरकार चालवत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी संबंधित कामांसाठी तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. मागील 11 व्या हप्त्यातील 10,92,35,641 रुपये गेल्या महिन्यात 31 मे रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात आले होते. आता 12वा हप्ता येणार आहे. असा अंदाज आहे की 12 व्या हप्त्याचे पैसे या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले जाऊ शकतात. 12 व्या हप्त्यासाठी काही राज्यांनी मंजुरी दिली असून शेतकऱ्यांचा डेटा अपलोड केला आहे, तर काही राज्यांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वेबसाइटवर त्यांची स्थिती तपासुन पाहु शकता.

पीएम किसानच्या वेबसाइटवरील स्थिती तपासण्यासाठी लाभार्थ्याला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही Beneficiary Status वर क्लिक करून तीन प्रकारचे स्टेटस पाहू शकता. ज्याद्वारे तुम्हाला कळेल की तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्यासाठी पैसे कधी मिळणार आहेत.

1) राज्याच्या मान्यतेची वाट पाहत आहे, (राज्याकडून मंजुरीची प्रतीक्षा करत आहे)

2) हस्तांतरणाची विनंती (राज्याने शेतकऱ्यांचा डेटा मंजूर केला आहे आणि केंद्राला पैसे पाठवण्यास सांगितले आहे)

3) FTO  हस्तांतरण प्रलंबित (पैसे हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पैसे कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतात)

लाभार्थ्यांना या योजनेशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास ते पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-24300606, 011-23381092 वर कॉल करू शकतात. याशिवाय पीएम किसान योजनेच्या  ई-मेल आयडीवरही (pmkisan-ict@gov.in) तक्रार नोंदवता येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने