मला शांती हवी आहे...मॉडेल महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आणि..

 


मुंबईतील अंधेरी परिसरात एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेलचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनाकडून  मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय मॉडेलने रात्री 8 च्या सुमारास हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यानंतर तिने जेवणाची ऑर्डरही दिली. हाऊसकीपिंग कर्मचारी जेवण घेऊन मॉडेलच्या खोलीत पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. हाऊसकीपिंगने वारंवार विनंती करूनही दरवाजा उघडला नाही आणि आतून आवाज आला नाही, त्यानंतर त्यांने हॉटेल मॅनेजरला याची माहिती दिली. प्रकरण संशयास्पद असल्याचे पाहून हॉटेल मॅनेजरने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांच्या उपस्थितीत मास्टर चावीने दरवाजा उघडण्यात आला, मात्र आत गेल्यावर महिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस अधिकार्‍यांच्या मते, 40 वर्षीय मॉडेलने तिच्या मृत्यूसाठी कोणालाच जबाबदार धरलेले नाही. तिने लिहिले, मला माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही. मी आनंदी नाही आणि आता मला शांती हवी आहे. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद मानून तपास सुरू केला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने