वर्षा उसगांवकर यांना का मागावी लागली कोळी समुदायाची माफी.

 


एक जाहिरातीच्या कॅम्पेन व्हिडिओ वरून वाद उद्भवल्या मुळे मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांना नुकतीच कोळी समाजाची माफी मागावी लागली. हा वाद एका ऑनलाइन ॲपवर मासे (Fish) विकणाऱ्या कंपनीच्या व्हिडीओविरोधात देशभरातील मच्छिमारांच्या असोसिएशनने आक्षेप नोंदविला असुन या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या कोळी मासे विक्रेत्यां विरोधात वक्त्यव्य करताना दिसत आहेत. 

या जाहिरातीत वर्षा उसगांवकर यांच्या तोंडी “मला अनेकदा शिळे आणि वास येणारे मासे दिले गेले”, असा संवाद असुन. हे म्हणत असतानाच त्या लोकांना ऑनलाईन ताजे मासे विकत घेण्याचं आवाहन त्या करत आहेत. याच व्हिडीओविरोधात मच्छिमार असोसिएशनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आता या वादानंतर वर्षा उसगावकर यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत मासेविक्रेत्यांची माफी मागितली आहे.

या व्हिडिओ द्वारे माफी मागताना त्या म्हणतात “जर कोळी समूहाच्या भावना मी अनवधानाने दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे”  


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने