रिकाम्या पोटी खा मखाणा, ज्याने मिळतील अनेक फायदे.

 




मखाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्यास आरोग्याच्या दृष्टीने विविध फायदे  मिळतात.  मखाणा म्हणजे पौष्टिक खाद्य. हे पॉपकॉर्न सारखे असते. मराठीत मखाणा म्हणजे कमळाचे बीज, पण याला मखाणा याच नावाने सर्वत्र ओळखले जाते. खाण्यासाठी हे पौष्टिक खाद्य असल्याने त्याचा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला फायदा होतो. तुपात भाजून सकाळी मूठभर मखाणा खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्ब्स आणि प्रोटीनची कमतरता लगेच पूर्ण होते. हे ग्लूटेन फ्री असतात. सकाळी मखाणा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल, फॅट व सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहते, आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. 

ओनली माय हेल्थ नुसार, मखाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि लोह मुबलक प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. मखाणामध्ये हेल्दी फॅट, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स आणि कॅलरीजही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी हे खाणे अधिक फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी मखाणा खाण्याचे फायदे 

हाडे मजबूत होतात: मखाणामध्ये भरपूर कॅल्शियम असल्याने ते खाल्याने हाडे मजबूत होतात. हाडे दुखत असतील तर सकाळी रिकाम्या पोटी हे खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सांधेदुखीमध्येही आराम मिळतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते: रिकाम्या पोटी मखाणा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level)  नियंत्रणात राहते. हे मधुमेहींसाठी ( diabetics) उत्तम खाद्य मानले जाते.

त्वचेसाठी फायदेशीर: मखाणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीएजिंग गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. त्वचा उजळते आणि अतिनील किरणांमुळे ( UV rays ) त्वचा खराब झाली असेल तर चांगली होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास फायदेशीर:वजन कमी करायचे असेल तर मखाणाचे सेवन रिकाम्या पोटी करा. यामध्ये असलेले घटक वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक लवकर लागत नाही. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील दूर होते.
हृदयासाठी फायदेशीर: मखाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स  गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या नाश्त्यामध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात राहतो.

गरोदरपणात फायदेशीर: गरोदरपणात मखाणा हे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे. हे खाल्याने गरोदर महिलांना सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. याच्या सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होऊन थकवा दूर होतो.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने