पूजेच्या वेळी डोके झाकणे का आवश्यक आहे?

 


हिंदू धर्मात पूजेसाठी अनेक नियम आहेत. पूजेच्या वेळी पद्धतीपासून सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक मानले गेले आहे. धार्मिक मान्यतांनुसार, पूजा करताना महिलांनी साडी किंवा दुपट्ट्याने आणि पुरुषांनी रुमालाने  किंवा टोपीने डोके झाकणे फार महत्वाचे आहे, अन्यथा तुमची पूजा अपूर्ण मानली जाते. पूजा करताना डोके झाकण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे

हिंदू धर्मग्रंथानुसार, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुमचे डोके झाकणे गरजेचे आहे, कारण ते तुमचा देवाप्रती आदर आणि भक्ती दर्शवते. याशिवाय शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की, डोके झाकून पूजा करावी जेणेकरून पूजा करताना व्यक्तीचे मन इकडे-तिकडे भटकू नये.  याचे आणखी एक कारण असे मानले जाते की पूजेच्या वेळी नकारात्मक ऊर्जा केसांद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि कधीकधी तुमचे केस पूजास्थानावर पडतात आणि नंतर ते स्थान अपवित्र होते. त्यामुळे पूजेच्या वेळी डोके झाकले पाहिजे. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने