'तारागिरी’ या युद्धनौकेचे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून जलावतरण.

 


प्रकल्प  17 ए मधील   तिसरी युद्धनौका  'तारागिरी’ (TARAGIRI) चे काल रविवारी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (Mazagon Dock Shipbuilders Ltd ) जलावतरण केले. या युद्धनौकेसाठी एकात्मिक बांधणी पद्धत वापरण्यात आली आहे. 149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद  लांबीची हि युद्धनौका असुन जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीच्या सामग्रीने तिची बांधणी करण्यात आली आहे. 

या जहाजाचे नामकरण या समारंभाचे प्रमुख अतिथी व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व त्यांच्या पत्नी श्रीमती चारू सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाला, व्हाइस ऍडमिरल नारायण प्रसाद, एव्हीएसएम, एनएम, आयएन (निवृत्त), माझगाव डॉक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाइस ऍडमिरल के एम देशमुख एव्हीएसएम, व्हीएसएम, सी डब्लू पी अँड ए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने