दुःखद बातमी : शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे निधन



ब्युरो टीम : अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी झटणारे हिंदू धर्माचे धर्मगुरु शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन झालंय. ते ९९ वर्षांचे होते. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नरसिंहपूरमध्ये ते वास्तव्याला असायचे. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्यप्रेदशमधील सिवनी जिल्ह्यातील जबलपूर येथील दिघोरी गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव पोथीराम उपाध्याय असं ठेवलं होतं. वयाच्या ९ व्या वर्षी घराबाहेर पडून त्यांनी धर्मकार्याला सुरुवात केली. यानंतर ते उत्तर प्रदेशच्या काशमीमध्ये त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद, वेदांग आणि शास्त्राचं शिक्षण घेतलं. १९४२ मध्ये ते क्रांतिकारी साधू म्हणून प्रसिद्ध झाले होते. १९८१ साली त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. त्यांच्याकडे बद्री आश्रम आणि द्वारकापीठाची जबाबदारी होती.
राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा राहिला. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही दांगडा होता. याआधीही वेगवेगळ्या धार्मिक मुद्द्यांवरही त्यांनी रोखठोक मतं मांडली होती. एकूणच धार्मिक वर्तुळातलं शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती हे नाव मोठं होतं.   भाजप आणि संघाविरोधात भूमिका मांडल्याने अनेकदा ते चर्चेत आले. आज त्यांचे निधन झाले असून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने