काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत खर्गे उतरणार, वाचा कोणाला देणार टक्कर.

 


काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी (Congress President Election)उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व संभाव्य उमेदवार आज आपले अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत दिग्विजय सिंह आणि शशी थरूर रिंगणात दिसत असले तरी गुरुवारी रात्री आनंद शर्मा, मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण आणि भूपिंदर सिंग हुडा या  नेत्यांच्या बैठकीनंतर तिसऱ्या उमेदवाराचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहे. दरम्यान, या निवडणुकीत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रवेश केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे सांगण्यात येत आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी रात्री सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. खर्गे यांचा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. खर्गे हे आठ वेळा आमदार, दोन वेळा लोकसभा आणि एक वेळ राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतच त्यांचा पराभव झाला आहे. खर्गे हे दलित नेते असुन, ते कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत.

खर्गे हे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. यापूर्वी गांधी परिवार गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवत होता. मात्र राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक न झाल्यामुळे गेहलोत आता पक्षाच्या नजरेतून उतरले आहेत. त्यामुळेच त्यांनी सोनिया गांधींना भेटल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खर्गे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शशी थरूर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी गुरुवारी दिग्विजय सिंह यांच्यासोबत बैठक घेतली.  दिग्विजय सिंह हे देखील शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने