आपल्या रोजच्या आहारातील हे, पदार्थ असे आहेत की जे एक्सपायर झाल्यानंतरही खराब होत नाहीत.



        मार्केटमध्ये जेव्हा आपण एखादा खाद्यपदार्थ (Food Items)विकत घेतो त्यावेळी त्यावर लिहलेली एक्सपायरी डेट तपासून घेत असतो. एक्सपायरी डेट  वरून तो पदार्थही किती काळापर्यंत  टिकू शकतो किंवा तो खराब होण्याच्या अगोदरच त्याचा वापर करता येऊ शकतो.

         एखाद्या पदार्थाची एक्सपायरी डेट संपलेला पदार्थ एखाद्या खाल्यास आरोग्यावर(Health problem) होऊ शकतात. अशावेळी व्यक्ती आजारही पडू शकते. परंतु आपल्या घरात असे अनके पदार्थ आहेत की जे पदार्थ आपण व्यवस्थित साठवून ठेवले तर ते आपण त्यांची  एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही आपण त्या पदार्थांचा वापर करू शकतो,  किंवा वरच काळ ते वापरू शकतो. हे तुम्हाला माहित आहे का? त्या पदार्थबद्दल आपण जाणून घेऊयात 

१) मध: मधामध्ये कमी आम्लीय पीएच असतो, जो बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून रोखते. मध  हा आपण एका  हवाबंद काचेच्या बाटलीत ठेवल्यास तो वर्षानुवर्षे टिकू शकतो. त्याचे कालांतराने स्फटिकीकरण (Crystalize) होऊ शकते, तरीही तो मध वापरणे किंवा सेवन करणे सुरक्षित असते.

२) मीठ: साधे पांढरे मीठ असो किंवा सैंधव, कोणत्याही प्रकारचे मीठ नीट स्टोअर करून ठेवल्यास बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही. एका हवाबंद डब्यात किंवा बाटलीत मीठ नीट साठवून ठेवावे.

३) साखर: साधारणपणे  मार्केटमध्ये आपण खरेदी केलेल्या रिफाइंड साखरेच्या पाकिटावर त्याचे शेल्फ लाइफ 2 वर्षं असल्याचे लिहलेले असते.  पण हीच साखर आपण व्यवस्थित साठवली तर त्याचा बराच काळ वापर करता येतो. कोरडी आणि स्वच्छ बरणीचा उपयोग साखर साठवण्यासाठी करावा. तसेच ती काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमच्या साठवलेल्या साखरेचे स्फटिकीकरण (Crystalize) होऊ लागली आणि त्यातून ओलसर वास येऊ लागला  ती वापरण्यास योग्य नाही असे समजावे व ती टाकून द्यावी.

४) पास्ता: पास्ता ओलाव्यामुळेही खराब होत नाही. एखादा हवाबंद डबा किंवा बाटलीमध्ये पास्टा स्टोअर करावा. त्याची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही 1 ते 2 वर्ष पास्ता वापरता येऊ शकतो. पास्तामध्ये किटकांचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता.

५) व्हिनेगर: व्हिनेगर हा एक स्वयं-जतन करणारा (Self-Preserving Agent) पदार्थ आहे. लोणच्यासारख्या इतर पदार्थांचे जतन करण्यासाठी आणि ते आंबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हिनेगर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये व्हिनेगर ठेवू शकता. उन्हाळ्यातही ते फार खराब होणार नाही.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने