छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे


ब्युरो टीम:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सतत काहीतरी नवीन भूमिका करण्यावर त्याचा भर असतो. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देतात. त्याने मराठीमध्ये चरित्रपट साकारण्याची परंपरा रुजवली. बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर  यांच्या भूमिका लीलया पेलल्या. आता पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. तो लवकरच एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.काल सुबोध भावेने सोशल मीडियावर 'उद्या सकाळी महत्वाची घोषणा करणार आहे' अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. सुबोध भावे नवीन ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सुबोध भावे 'हर हर महादेव' या चित्रपटात  'छत्रपती शिवाजी महाराज' यांची भूमिका साकारणार आहे.

     त्याने पोस्ट शेअर करताना म्हटलंय कि, ''छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आठवतं त्यांचं रूप, त्यांचा प्रताप आणि मनात डोकावून जातात त्यांच्या असाधारण शौर्यकथा...तो दरारा, तो रूबाब, त्यांची अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि ती सत्यात उतरवताना केलेल्या लढाया...झी स्टुडिओज् अभिमानाने सादर करीत आहे, शिवरायांच्या भूमिकेत अष्टपैलू अभिनेता  येत्या दिवाळीत संपूर्ण भारतात घुमणार स्वराज्याचा महामंत्र, आपल्या शिवरायांची शिवगर्जना 'हर हर महादेव' ते ही पाच भाषांमध्ये.''

     या चित्रपटातील सुबोधने 'छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील पोस्टर रिलीज झाले आहे.  हे पोस्टर अल्पावधीतच व्हायरल झाले आहे. आतापर्यँत खऱ्या भूमिका पडद्यावर जिवंत करणाऱ्या   सुबोध भावे 'छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या' भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

       सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात झी मराठीवर त्याचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम सुरु झाला आहे. तसेच 'मारवा' या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच 'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता' ही  नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने