वेळेला अंगावर आला तर अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 


        नगर सोपं नाही. इथं वर्षानुवर्षे काही मंडळी काम करतात. त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. इथं जो दम धरू शकतो, तोच टिकू शकतो. वेळेला अंगावर आला तर अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे. हे नगरच वैशिष्ट्य आहे. किरण काळे हा दमदार माणूस आहे. वेळप्रसंगी शिंगावर घ्यायची, जशाला तसं उत्तर देण्याची त्यांची तयारी आहे. एक दिवस तुमचा नक्की येणार. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

        आ. थोरात म्हणाले की, काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून भाजप आवाक झाली आहे. त्यामुळे तथ्य नसलेले आरोप ते करत आहेत. या यात्रेचा भाजपकडून धसका घेतला गेला आहे. यावेळी आ. डॉ. तांबे, आ. कानडे यांची भाषणे झाली. सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.बापू चंदनशिवे यांनी सूत्रसंचलन केले. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने