श्रीलंकेच्या कालच्या विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी का व्यक्त केला आनंद.

 

        काल झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर मात करत श्रीलंकेच्या संघाने तब्बल आठ वर्षांनी आशिया कप जिंकला. सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत   १७१ धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले होते. परंतु पाकिस्तान ते आव्हान पेलू शकला नाही त्यांनी २० षटकात सर्वबाद फक्त १४७ धाव करू शकला व श्रीलंकेने सामना २३ धावांनी विजय मिळवत आपल्या खिशात घातला 

        श्रीलंकेच्या या विजयानंतर उद्योगपती आनंद महिंन्द्र यांनी एक ट्विट करत आनंद व्यक्त केला त्यांनी आपल्या ट्विटर वर लिहले कि “श्रीलंकेच्या विजयामुळे मला फार आनंद झाला आहे. मात्र पाकिस्तानचा पराभव व्हावा असं मला वाटत असल्याने हा आनंद झालेला नाही. तर श्रीलंकेचा विजय हा आपल्याला आठवण करुन देणार आहे की सांघिक खेळ हे सेलिब्रिटी खेळाडू किंवा सुपरस्टार्सबद्दल नसतात तर ते सांघिक योगदानाबद्दल आणि कौशल्याबद्दल म्हणजेच टीम वर्कबद्दल असतात.” 



        श्रीलंकेच्या विजयात भामुका राजपक्षाच्या तुफानी अर्धशतक याचा मोठा वाटा राहिला.  तसेच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला ज्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या धावसंख्येला यावेळी खीळ बसवता आली. पाकिस्तानचा बाबर आझम हा श्रीलंकेच्या विजयाच्या मार्गात अडसर बनू पाहत होता.त्याने ५५ धावांची खेळीही साकारली. पण श्रीलंकेच्या डीसिल्व्हाने त्याला बाद केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. कारण श्रीलंकेने या सामन्यात २३ धावांनी अटीतटीच्या सामन्यात विजय साकारला. श्रीलंकेसाठी हा एक मोठा विजय ठरला. कारण यजमान असूनही त्यांना या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्याचबरोबर या विजयाचा मोठा परीणाम त्यांच्या संघावर होईल आणि याचा फायदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आता श्रीलंकेचा संघ विश्वचचषकात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने