अंकिताचा शवविच्छेदन अहवाल आज येणार, मृत्यूच्या कारणाचा होणार खुलासा.

 


उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील वंतारा रिसॉर्टची महिला रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृत्यू झाला (Ankita Bhandari Murder) मात्र अंकिताचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. त्याचवेळी रविवारी सायंकाळी उशिरा अंकितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकिताचा शवविच्छेदन अहवाल आज  येणे अपेक्षित आहे. या अहवालामुळे मृत्यूच्या कारणासह अनेक खुलासे होऊ शकतात.

अंकिता भंडारीचा शवविच्छेदन अहवाल आज अपेक्षित आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल की, मृत्यूचे कारण काय? या पोस्टमार्टम रिपोर्टवरून अंकिताच्या अंगावरील जखमांच्या खुणा कशामुळे होत्या आणि तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की मृत्यूचे कारण आणखी दुसरे आहे  हे स्पष्ट होईल. त्याचवेळी, अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. याशिवाय हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी देण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.

सीएम पुष्कर सिंह धामी यांच्या आश्वासनानंतर अंकिता भंडारी यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला होता. त्यानंतर एनआयटी घाटावर अंकिता भंडारी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीएम धामी यांनी कुटुंबाची मागणी मान्य केल्याचे सांगितले आहे. मात्र, याआधी अंकिताच्या कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळण्यापूर्वी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. एम्सच्या प्राथमिक अहवालावर अंकिताचे वडील समाधानी नव्हते.

एम्सच्या प्राथमिक अहवाला नुसार अंकिताचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सीएम धामी यांनी त्यांना मुलीचे अंतिम संस्कार करण्याचे आवाहन केले. तसेच सीएम धामी यांनी कुटुंबियांना सांगितले की त्यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, तसेच या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जलदगती न्यायालयासाठी त्यांनी राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्रही लिहिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने