जाणुन घ्या तुमच्या राशीनुसार कोणती वनस्पती तुमच्यासाठी शुभ आहे.

 


        झाडांचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे, सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात झाडे लावून त्याचे संवर्धन करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. जर तुम्ही आपल्या राशीप्रमाणे झाड लावले व त्याचे संवर्धन केले तर सामाजिक कर्तव्या बरोबरच तुम्ही तुमचे भाग्य उजळु शकता तसेच आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रत्येक वनस्पती ही एक वनौषधी आहे, जी माणसाला कोणत्याही रूपात लाभदायक ठरू शकते, ज्योतिषशास्त्रातही वनस्पतींचे खूप महत्त्व आहे. आपल्या प्राचीन ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीसाठी विशिष्ट प्रकारचे वनस्पती किंवा झाड निवडले गेले आहे, ज्याचे संगोपन केल्याने जातकास फायदा होऊ शकतो तर या साठी जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कोणती वनस्पती तुमच्यासाठी शुभ राहील

1. मेष:  राशीच्या लोकांचा राशी स्वामी मंगळ असुन त्यांनी लाल चंदन, डाळिंब, लिंबू, तुळस, आवळा, आंबा आणि खैराचे झाड लावावे. 

2. वृषभ: राशीच्या लोकांचा राशी स्वामी शुक्र असुन त्यांनी गुलार (ओमर), चमेली, चुना, अशोक, जामुन आणि पालस ही झाडे लावावीत. 

३. मिथुन: राशीच्या लोकांचा राशी स्वामी बुध असुन त्यांनी अपमार्ग, आंबा, फणस, द्राक्षे, वेल, बांबू, वड, गुलाबाची लागवड करावी.

4. कर्क : राशीच्या लोकांचा राशी स्वामी चंद्र असुन त्यांनी पलाश, पांढरा गुलाब, चांदणी, मोगरा, करवंद, पीपळ आणि झेंडूची झाडे लावावीत. 

5. सिंह: राशीच्या लोकांचा राशी स्वामी  सूर्य असुन, त्यांनी लाल गुलाब, लाल झेंडू, जामुन, वट आणि लाल चंदनाचे झाड लावावे. 

6. कन्या: राशीच्या लोकांचा राशी स्वामी बुध असुन, त्यांनी आंबा, फणस, द्राक्षे, वेल, पेरू, वेल आणि गुलाबाची लागवड करावी. 

7. तुळ:  राशीच्या लोकांचा राशी स्वामी शुक्र असुन, त्यांनी गुल (ओमर), चमेली, चुना, मौलसिरी, अर्जुन, चिकू आणि पालस ही झाडे लावावीत. 

8. वृश्चिक : राशीच्या लोकांचा राशी स्वामी मंगळ असुन  त्यांनी लाल चंदन, डाळिंब, लिंबू, तुळस, कडुलिंब आणि खैराचे झाड लावावे. 

9. धनु:  राशीच्या लोकांचा राशी स्वामी गुरू असुन त्यांनी, पीपळ, वट, पपई, कदंब आणि पिवळे चंदनाचे झाड लावावे. 

10. मकर: राशीच्या लोकांचा राशी स्वामी शनि असुन त्यांनी शमी, तुळशी, आमवारी, सातावर, फणस, पेरूचे झाड लावावे. 

11. कुंभ: राशीच्या लोकांचा राशी स्वामी शनि असुन त्यांनी शमी, तुळशी, आमवारी, सातावर, फणस, पेरूचे झाड लावावे. 

12. मीन: राशीच्या लोकांचा राशी स्वामी गुरू असुन त्यांनी, पीपळ, वट, पपई, कदंब आणि पिवळे चंदनाचे झाड लावावे.

आत्ता पावसाळ्याच्या दिवसात कोणत्या राशीसाठी कोणती वनस्पती फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला माहीत झाले आहे  जर तुम्ही तुमच्या राशीनुसार ही झाडे किंवा रोपे तुमच्या घरामध्ये आणि अंगणात योग्य ठिकाणी लावलीत तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. या वनस्पती तुमच्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर करू शकतील. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने