अमित ठाकरे यांनी नोंदवला स्वच्छता मोहिमेत सहभाग


मुंबई ब्युरो: राज्यात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan)एकदम उत्साहात व शांततेत पार पडले असून गेल्या दोन वर्षी करोनाच्या संकटामुळे गणेश भक्तांची झालेली निराशा आता उत्साहात परावर्तित झाली आहे यंदा निर्बंध मुक्त वातावरणात हा सोहळा पार पडला आहे.

आज सकाळपर्यंत मुंबई येथील विसर्जन मिरवणुका सुरू होत्या पूर्ण 24 तासानंतर गणेश भक्तांचा उत्साह काही कमी झाला नव्हता एकीकडे हा भक्तांचा उत्साह सुरू असतानाच दुसरीकडे मनसेच्या (MNS) हटक्या उपक्रमाची जोरदार चर्चा होती. विसर्जनानंतर मनसेकडून समुद्र किनारी स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत अमित ठाकरे (Amit Thakre) यांचा देखील सहभाग दिसला असून त्यांनी स्वयंसेवकांबरोबर खांद्याला खांदा लावून या स्वच्छते मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान किनाऱ्यालगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून आले ते एकत्र केले गेले आता ते  अवशेष महापालिकेकडे दिले जाणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये या उद्देशाने  स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या मोहिमेत हिरारीने यात सहभाग नोंदवला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने