प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनतर्फे भौतिकवादावर चर्चासत्राचे आयोजन

 

ब्युरो टीम : प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन या संस्थेने  समाजातील भौतिकवादावर चर्चासत्राचे आयोजन केलं आहे.  प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन  अध्यक्ष डॉ. प्रा. बापू चंदनशिवे व सचिव रामदास वागस्कर यांच्या कल्पनेतून आयोजित होणाऱ्या या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात द्वंदात्मक व ऐतिहासिक भौतिक वाद या विषयावर नागपूर विद्यापीठाचे प्रा. युगल रायलू यांचे व्याख्यान होणार आहे. \तर दुसऱ्या सत्रात 'लूसी' हा हॉलीवूडचा चित्रपट दाखवला जाणार आहे . 

     रविवारी होणाऱ्या या चर्चासत्रात पहिले सत्र हे द्वंदात्मक व ऐतिहासिक भौतिक वाद या विषयावर सकाळी ११. ०० ते दुपारी २. ०० वाजेपर्यंत चालणार आहे. दुसरे सत्र हे दुपारी २. ३० ते ४. ०० वाजेपर्यंत चालणाऱ्या या सत्रात 'लूसी' हा हॉलीवूडचा चित्रपट दाखवून त्यावर चर्चा घडवली जाणार आहे. 

         चर्चासत्र हे रेहमत सुलतान हॉल छबुराव लांडगे चौक , सर्जेपुरा अहमदनगर येथे होणार आहे. या चर्चसत्रासाठी शहरातील जाणकारांनी उपस्थित राहून या सहभागी व्हावे अशी विनंती  या कार्यक्रमाचे संयोजक इंडियन पीपल थेटर्स  असोशिएशन चे  विकास गोसावी यांनी केले आहे. 

  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने