भारतीय नौदलाची आयएनएस तरकश (INS Tarkash) ही युद्धनौका सागरी चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी सुरु असलेल्या गिनीच्या आखातामधील गॅबन येथील पोर्ट जेंटिल येथे पोहोचली. भारतीय नौदलाच्या एखाद्या जहाजाने गॅबनला दिलेली ही पहिलीच भेट आहे.बंदरावरील आपल्या मुक्कामादरम्यान जहाज आणि त्यावरील कर्मचारी व्यावसायिक संवाद तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील.
जहाजाच्या व्यावसायिक संवादामध्ये अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण, वैद्यकीय आणि अपघातग्रस्तांच्या सुटकेबाबतच्या समस्या आणि डायव्हिंग ऑपरेशन्सवरील चर्चा आणि कवायती याचा समावेश असेल. यावेळी काही भेटी देखील होतील. याशिवाय, योग सत्रे आणि सामाजिक संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच हे जहाज पर्यटकांना पाहण्यासाठी देखील खुले राहील. .
टिप्पणी पोस्ट करा