बुधवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी १ मे या तारखेचा उल्लेख शिवजयंती असा केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच सुनावले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची?
— nitesh rane (@NiteshNRane) September 21, 2022
नालायक!! pic.twitter.com/UWkL25Uh0f
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत "यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची?" असं कॅप्शन लिहले आहे. ठाकरे यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडिया वर बऱ्याच जणांनी पोस्ट करुन ठाकरे यांना ट्रोल केले आहे
टिप्पणी पोस्ट करा