विदर्भात पक्षांतर्गत बदल होतील, बदलांना तयार राहा: राज ठाकरे

 


आज राज ठाकरे सुमारे तीन वर्षांनंतर नागपूर मध्ये आले आहेत. मुंबईतून विदर्भ एक्स्प्रेसने राज ठाकरे आज सकाळी नागपुरात पोहोचले. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं. राज ठाकरे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रवी भवन सर्किट हाऊसवर संघटनात्मक बैठक घेतली. याच बैठकीत मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले "आगामी काळात विदर्भात पक्षांतर्गत बदल होतील. खांदेपालटही होईल. बदलांना तयार राहा. तुमच्यावर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी आहे. पण एक निश्चित आहे की नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल", 

राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल, असं मोठं विधान केल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  तसेच राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले, "आपल्याजवळ अजुन कालावधी आहे. कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहेत, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरात जाऊन. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल"


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने