राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हे एक-दोन स्पष्ट होणार आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी गुरुवारी संध्याकाळी मीडियाला सांगितले "पुन्हा एकदा निरीक्षक जयपूरला जाणार आहेत. विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाणार आहे. त्यानंतर गेहलोत मुख्यमंत्री होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल."
तर काल गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सचिन पायलट यांनी देखील सोनिया गांधीं यांची भेट घेतली. वेणुगोपालही त्यावेळेस उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर सचिन पायलट यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले "राजस्थानबाबत हायकमांडशी सविस्तर चर्चा झाली असुन, परत राजस्थानमध्येही सरकार स्थापन करावे, हाच आमचा उद्देश आहे. याबाबत सर्व काही निश्चित केले जाईल. सोनिया गांधींनी माझे म्हणणे अगदी शांतपणे ऐकले. तसेच जयपूरमध्ये घडलेल्या प्रकारावर सविस्तर चर्चा झाली. मी माझ्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. जो निर्णय होईल तो पक्ष तो घेईल. 30 वर्षांपासून राजस्थानमध्ये पाच वर्षांने सत्ताबदल सुरू आहे. परंतु 2023 मध्ये आमचेच सरकार परत कसे येईल, हे उद्दिष्ट ठेवून आम्हाला काम करायचे आहे. यावर सविस्तर चर्चा झाली असुन, राजस्थानमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याला आमचे प्राधान्य आहे." परंतु राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर पायलट यांनी दिले नाही.
टिप्पणी पोस्ट करा