राज्य शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे: सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार

 


राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.त्यांनी काल विविध विषयांसंदर्भात कलाकारांसोबत चर्चा केली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन कलाकारांना दिले 

सह्याद्री अतिथीगृहात काल ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, दिग्दर्शक जब्बार पटेल तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत चर्चा झाली. यानंतर श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्यांचे  लवकर निराकरण करण्यात येईल. राज्य शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने