'तो' कधी रडतो? पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबतची ही माहिती जाणून तुह्मीही व्हाल थक्क!

ब्युरो टीम : स्त्री आणि पुरुष  (Men) दोघेही तणाव, चिंता ( anxiety ), नैराश्याने ग्रस्त असतात. महिलांच्या तुलनेत पुरुष त्यांची मानसिक स्थिती इतरांसोबत शेअर करण्यास टाळाटाळ करतात. अनेक पुरुष त्यांच्या मनातील भावना आणि तणावाबाबत, त्या मागच्या कारणांबाबत उघडपणे बोलत नाहीत. कारण आजही हे समाजात निषिद्ध  (Taboo) आहे. 
तणाव  (Stress) आणि नैराश्याने  (Depression) ग्रासलेल्या अनेक पुरुषांनी त्यांच्या समस्या दुसऱ्यासोबत शेअर करणे टाळतात. पण आता पुरुषांच्या मानसिक आरोग्याची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारे असेच काही मिथक आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जे पुरुषांवर लादले गेले आहेत. प्रत्यक्षात सत्य काही वेगळेच आहे.

पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित काही मिथक आणि सत्य

मानसिक आधाराची गरज नाही

पुरुषांना मानसिक आधाराची गरज नसते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण तसे अजिबात नाही. पुरुषांनाही मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे ते स्वतःला एकटे असल्याचे समजत नाहीत, व अधिक चांगले त्यांना जगता येते.

पुरुष जास्त रागावतात
 
राग येणे ही प्रत्येकासाठी सामान्य गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल, आणि ती त्याच्या मनातील गोष्ट  सांगू शकत नसेल, किंवा मानसिकदृष्ट्या थकली असेल, तर कोणत्याही व्यक्तीला राग येऊ शकतो. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष.

पुरुष कधीही रडत नाहीत

लहानपणापासून पुरुषांना शिकवले जाते की मुली रडतात, मुले नाही. मात्र, सत्य काही वेगळेच आहे. रडणे ही एक मानसिक भावना आहे, जी तणाव कमी करण्यासाठी मदत करते. पण जेव्हा माणूस रडत नाही, आणि ताणतणाव असूनही स्वत:ला खंबीर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरं तर त्याला आतून खूप दडपण जाणवत राहतं आणि तो अस्वस्थ राहतो. अशा वेळी त्यांनी आपल्या भावना कुठेतरी शेअर करणे आणि मेडिटेशनची मदत घेणे महत्त्वाचे आहे.

पुरुष भावनिक नसतात

प्रत्येक माणसाप्रमाणे पुरुषही भावनाप्रधान असू शकतो. हे कमजोरी चे लक्षण नाही. पुरुषांचे भावनिक असणे, ही एक सामान्य गोष्ट असल्याचे  मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर सांगतात. त्यामुळे पुरुषांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा, त्या शेअर करण्याचा अधिकार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने