योग्य बचत केल्यास पोस्ट ऑफिस मधील हि योजना तुम्हाला लखपती करू शकते.

 


प्रत्येकाने भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बचत केली पाहिजे. तसे पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय आहेत. बरेच लोक शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात. या सगळ्यात बरीच जोखीम असते. पोस्ट ऑफिसमध्ये देखील गुंतवणुकीसाठी अनेक बचत योजना आहेत ज्यात उच्च व्याजदरासह कर सवलत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हि गुंतवणूक एकदम सुरक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा  स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवू शकता. चांगल्या परताव्याचा सुरक्षित पर्याय शोधात असाल तर  तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत गुंतवणूक करा. 

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्याने आपला पैसा तर सुरक्षित राहतोच, पण चांगला परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम गुंतवणुकीत पैसे कधीही बुडत नाहीत. कारण ही योजना सरकारच्या देखरेखीखाली चालवली जाते. आरडी खात्यात काही पैसे जमा करूनही मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. आरडी खाते फक्त 100 रुपये जमा करून सुरू करता येते. सध्या या ठेव योजनेवर ५.८ टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत पैसे जमा करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. ही ठेव तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा तीन वर्षांसाठी करता येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आरडीमध्ये ठेवलेल्या पैशावर व्याज तिमाही दराने दिले जाते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी, तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याज जमा केले जाते.

१८ वर्षांवरील कोणीही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये खाते उघडू शकते. यामध्ये तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. अल्पवयीन व्यक्तीचे खातेही पालक उघडू शकतात. यासाठी खातेदाराची वय 10 वर्षांपेक्षा जास्त असावे. या योजनेतून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. जर तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर. त्यामुळे तुम्हाला १० वर्षानंतर ५.८ टक्के व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर, तुम्हाला 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. जर तुम्ही दरमहा 10,000 रुपये जमा केले, तर तुम्हाला 10 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 5.8 टक्के दराने व्याज मिळाल्यावर तुम्हाला 16,28,963 रुपये मिळतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने