पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तेथे ते जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी शिंजो आबे यांच्या पत्नी अक्की आबे यांची शिष्टाचार भेट घेतील. यादरम्यान ते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अन्य नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी ही माहिती दिली आहे.

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, "पंतप्रधान मोदी जपानमधील टोकियोला भेट देणार आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी ते आजपासून काही तासांत रवाना होतील. पंतप्रधान बुडोकान येथील शासकीय अंत्यसंस्कार समारंभाला उपस्थित राहणार असुन. त्यानंतर तेथे टोकियो येथील अकासाका पॅलेस येथे अभिवादन करण्याचा कार्यक्रम असेल."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने