पाकिस्तानच्या पराभवानंतरही भारतीय संघ फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो


ब्युरो टीम: भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुपर-४ फेरीत पराभव पत्करावा लागला. या फेरीत भारताचा हा पहिलाच सामना होता आणि त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे, तर पाकिस्तानने फायनलच्या दिशेने कूच केली आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही भारतीय संघ अंतिम फेरीत कसा पोहोचू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे.

          सुपर -४ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला, तर पाकिस्तानने मोक्याच्या वेळी विजय साकारला आणि अंतिम फेरीच्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण केले आहे. पण भारताचे या स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलेले नाही. भारताचे या स्पर्धेच्या सुपर-४ फेरीतील दोन सामने होणार आहेत. या दोनपैकी पहिला सामना हा श्रीलंकेबरोबर ६ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. भारताला या दोन्ही सामन्यांमध्ये विजय तर मिळवावाच लागणार आहे. यापैकी एका सामन्यात जरी भारताचा पराभव झाला तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण भारताला या दोन्ही सामन्यांमध्ये फक्त विजय मिळवून चालणार नाही.

        या स्पर्धेत फक्त एकच संघ तीन सामने जिंकू शकतो. पण अन्य एक संघ जो फायनलमध्ये पोहोचेल त्याला दोन विजय तर मिळवावेच लागतील. पण त्याचबरोबर रनरेट यावेळी हा सर्वात महत्वाचा ठरणार आहे. कारण या स्पर्धेतील सुपर-४ फेरीत दोन संघ असे ठरू शकतात ज्यांनी दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी अंतिम फेरीत तोच संघ जाईल, ज्याचा रनरेट जास्त असेल. त्यामुळे आता पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजय तर मिळवायचा आहेच, पण त्याचबरोबर हे विजय मोठ्या फरकाने त्यांना मिळवावे लागतील. जर भारताने आगामी दोन्ही सामन्यांमध्ये मोठे विजय साकारले तरच त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे आता दोन्ही सामने भारतासाठी महत्वाचे असतील आणि हे दोन्ही सामेन फक्त जिंकून चालणार नाही तर त्यांना मोठ्या फरकाने या सामन्यांमध्ये विजय मिळवावे लागतील. त्यामुळे आता पुढील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना यावेळी संधी दिली जाते, याकडेही क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने