पुण्यातील बहूचर्चित असा चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतूकीसाठी बंद.

 


पुण्यातील बहूचर्चित असा चांदणी चौकातील पूल 18 सप्टेंबर रोजी पाडणार असल्या कारणाने आजपासून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गचा वापर करावा असे पोलिसांकडून आव्हान करण्यात आले असुन नागरिकांना बावधान आणि पाषाण कडे जायचे असल्यास मोठा वळसा घालून जावे लागणार आहे

येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार असून दिल्लीतील ट्वीन टॉवर ज्या कंपनीने पाडले त्याच कंपनीला हे पुल पाडण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे पुल तोडण्याची पूर्वतयारी आता चांदणी चौकात सुरू झाली आहे त्याचाच भाग म्हणुन या पुलावरून होणारी वाहतूक आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे 

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी साठी  कारणीभूत असणारा पूल जमीनदोस्त करण्यात येणार असुन आजपासून इथल्या वाहतुकीत बदल करण्यात येत आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने