भाजपच्या 'मिशन मुंबई'चा आज 'श्रीगणेशा; अमित शहा लालबागच्या दर्शनाला

ब्युरो टीम: मुंबई महापालिका निवडणुकीच्या  तोंडावर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  हे आज मुंबईमध्ये दाखल झाले आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आज भाजपच्या सर्व नेत्यांना बैठकीला बोलावले आहे.

       अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी १२ वाजता मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भात अमित शहा यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शहा मुंबई भाजपा कोअर टीमला मुंबई पालिका निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहीत सर्व भाजप आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.

     त्याआधी अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर 11 वाजता जाणार आहे. त्यानंतर अमित शाह वांद्र्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतील, त्यानंतर 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शाह बैठक घेणार आहेत, तसंच फडणवीसांच्या गणपतीचंही ते दर्शन घेतील.

     फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अमित शहा दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपतीला जातील. 3 वाजता विद्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर शाह 5 वाजता दिल्लीला रवाना होतील.

      आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. देशातलं सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचं भाजपचं मिशन आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने