वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेच्या फैरी झाडल्या जात असुन. याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. आमदार राम कदम यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला MIDC ने उत्तर पाठवले असुन महाविकास आघाडी सरकारने वेदांता–फॉक्सकॉन यांच्या बरोबर कोणताही MOU केला नव्हता अशी माहिती समोर येत आहे
या पत्राला महाराष्ट्र भाजपाने आपल्या ट्विटर अकाउंट वर प्रसिद्ध केले असून त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यात लिहले आहे "आदित्य ठाकरे, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात व्हावे त्यासाठी काय प्रयत्न केले आपण? उलट तुमच्या निष्क्रियतेमुळे फॉक्सकॉन गेली.BMC च्या हद्दीत मातोश्री-2 बांधणे किंवा वरळीची सीट मिळवणे इतके सोप्पे वाटले का?"
टिप्पणी पोस्ट करा