स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडून नथुराम गोडसेंवरील चित्रपटाच्या तयारीला लागले महेश मांजरेकर?

 

ब्युरो टीम:  महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि रणदीप हुड्डा अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्थात सिनेमा सावरकरांवर आहे, हा सिनेमा चर्चेत येण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असला तरी त्याचं दिग्दर्शन मराठीतले फायरमॅन महेश मांजरेकर करणार यामुळे देखील अनेकांचा सिनेमाप्रतीचा इंट्रेस्ट वाढला होता.  यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं २८ मे रोजी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरची खूप चर्चा झाली त्याबरोबर रणदीप हुड्डाचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशनही लोकांना खूप आवडलं. रणदीपनं तब्बल २५ किलो वजन या भूमिकेसाठी कमी केलं आहे. त्यात रणदीप हुड्डानं सिनेमात सावरकरांच्या भूमिकेत फीट दिसण्यासाठी कमी केलेलं वजन याचा देखील गेल्या काही दिवसांत मोठा बोलबाला झाला होता. 

         पण आता सिनेमा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. यामुळे मांजरेकरांच्या चाहत्यांचे मन मात्र दुखावणार आहे. कारण एका मीडिया वृत्तानुसार म्हणे मांजरेकरांनी आता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातून काढता पाय घेतला आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकर बाहेर पडले असून आता रणदीप हुड्डा सिनेमाचा मुख्य अभिनेता साकारण्यासोबतच सिनेमाच्या दिग्दर्शकाची महत्त्वाची भूमिकाही बजावणार असल्याचं बोललं जात आहे.

             अद्याप मांजरेकर किंवा रणदीप हुड्डा दोघांनीही याबाबतीत स्पष्टिकरण दिलं नसलं तरी आता सिनेमाचा दिग्दर्शक बदलला अशी चर्चा मात्र जोरात सुरू झालीय. सिनेमाचं चित्रिकरण पुढील आठवड्यात सुरू होणार होतं पण आता ऐनवेळी मांजरेकरांची सिनेमातून एक्झिट झाल्यानं कदाचित हे चित्रिकरण पुढे ढकललं जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे.

           सिनेमाला काहींचा विरोध होताना दिसला होता त्यामुळे मांजरेकरांनी सिनेमातून बाहेर पडण्याचं ठरवलं असं देखील कानावर पडत आहे. पण आता खरंच हे कारण आहे की काही तांत्रिक कारणं हे अद्याप ठोस कळू शकलेलं नाही. सध्या तरी रणदीप हुड्डा सिनेमाचा नवा दिग्दर्शक म्हणून घोषित केला जाईल अशी वातावरण निर्मिती झालेली दिसून येत आहे.

         सध्या मांजरेकर 'बिग बॉस मराठी ४' च्या तयारीत व्यस्त आहे. २ ऑक्टोबर पासून तो शो देखील सुरू होत आहे. त्यात 'गोडसे' सिनेमावर देखील ते काम करत आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने