नऊ ग्रेड सेपरेटर, सात रेल्वे पूल उभारणार; पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मेगाप्लान

 नऊ ग्रेड सेपरेटर, सात रेल्वे पूल उभारणार; पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मेगाप्लान

ब्युरो टीम: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार शहरात नऊ ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल; तसेच सात रेल्वे पुलांची निर्मिती करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. पैकी चांदणी चौक उड्डाणपूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या विकासकामांसाठी राज्य सरकारकडूनही निधी मिळवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

‘पीएमपी’ची सेवा दर्जेदार करण्याचे प्रयत्न सुरू

       शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. एकीकडे ‘मेट्रो’ मार्गांची निर्मिती करण्यात येत असून, दुसरीकडे ‘पीएमपी’ची सेवा दर्जेदार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील वाहतूक कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या ‘बॉटल नेक’ रस्त्यांच्या विस्तारीकरणाची आवश्यकता आहे. महापालिकेने दहा वर्षांपूर्वीच सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यानुसार, उड्डाणपूल; तसेच ग्रेड सेपरेटर तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या विकासकामांना म्हणावी तशी गती मिळाली नाही. शहरात वाहतूक कोंडीचा विळखा वाढत असून, ही कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित विकासप्रकल्पांचा नुकताच आढावा घेण्यात आला.

गणेशखिंड रस्त्यावर चार ग्रेड सेपरेटर

         पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी ते निगडी या रस्त्याप्रमाणेच वाहनांची प्रचंड गर्दी असलेल्या गणेशखिंड रस्त्यावर ‘ग्रेड सेपरेटर’चे जाळे विणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाजीनगर ते आचार्य आनंदऋषीजी चौकापर्यंत चार ‘ग्रेड सेपरेटर’ तयार करण्यात येणार आहेत. शिवाजीनगर येथे शिमला ऑफिसच्या दारात, सेंट्रल मॉलच्या समोर हरेकृष्ण मंदिर पथाला जोडणाऱ्या चौकात, आचार्य आनंदऋषीजी चौकात औंधच्या दिशेने जाणासाठी आणि अभिमानश्री सोसायटी चौक अशा चार ठिकाणी ‘ग्रेड सेपरेटर’ प्रस्तावित आहे.

--------------




ब्युरो टीम:  विकासाचा आनाभाका घेऊन सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात   पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.

       महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार पुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आह.

      महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे, मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे, अशी माहिती महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाशी बोलताना दिली.

     याआधी महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने 1 जून 2022 पासून वीज कंपन्यांना फ्यूल एडजस्टमेंट चार्ज (एफएसी) लावण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या 10.5 लाख, 7 लाख टाटा पॉवर, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएलच्या 2.8 कोटी ग्राहकांना फटका बसला आहे.

राज्य सरकारकडे निधीची मागणी

         महापालिका प्रशासनाकडून लवकरच विकास प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून राज्य सरकारला साकडे घालण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रेल्वे पुलांच्या निर्मितीची आवश्यकता आहे. संरक्षण आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर येथील कामे करणे सहज शक्य होणार आहे.



ग्रेड सेपरेटर अन् उड्डाणपूल


- काळूबाई चौक, सोलापूर रस्ता


- खराडी बायपास, नगर रस्ता


- वाघोली चौक, नगर रस्ता


- खडकी पोलिस ठाणे चौक, मुंबई-पुणे रस्ता


- चांदणी चौक, पौड रस्ता


- नळस्टॉप चौक, कर्वे रस्ता


- राजाराम पूल, सिंहगड रस्ता


- दांडेकर पूल, सिंहगड रस्ता


- ५०९ चौक, विमानतळ रस्ता



रेल्वे ओव्हर ब्रिज


-घोरपडी


- घोरपडी (बीएफसीसी रस्ता)


-ससाणेनगर


रेल्वे पुलांचे विस्तारीकरण


- मंतरवाडी-सासवड रस्ता


- के. बी. जोशी रस्ता, शिवाजीनगर


- मुंढवा-मगरपट्टा रस्ता


- खडकी पोलिस ठाणे चौक

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने