काय आहे महालय श्राध्द ? पितृपंधरवड्यात श्री अगस्थी मुनीनी सांगितलेली उपासना माहित आहे का?

 


पितृपंधरवड्यात (Pitru Paksh) महालय श्राध्द केले जाते. खरेतर हा धार्मिक विधी आपल्या पुर्वजांचा आदर करण्याबरोबरच पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी आहे. त्यासाठी श्री अगस्थी मुनीनी एक उपासना सांगितली आहे. हिंदू प्रथेप्रमाणे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांत आपले पुर्वज आपल्याला भेटावयास येतात. कारण त्यांची अशी इच्छा असते की आपण त्याना कांही देवू. म्हणून त्याना आपण काळे तीळ व पाणी देवून त्यांची तहान भूक क्षमवू शकतो. त्यांची तृप्ती झाल्यावर आपल्याला ते आशीर्वाद देतात. या पितृपक्षात विष्णूलोकाचे दार पितराना आत येण्यासाठी १५ दिवस उघडले जाते. परंतु त्यात एक अडथळा असतो. तो अडथळा असा की जे पितर आपल्या चांगल्या कर्मानी युक्त असतात किंवा त्यांच्या वारसदारांनी देवदूतास केलेली विनंती असेल तरच ते विष्णूलोकात प्रवेश करु शकतात. म्हणूनच आपण आपल्या कर्मातून त्याना फल अर्पण करु शकतो. ज्यायोगे पितर विष्णूलोकांत प्रवेश करु शकतील.परंतु हे फल फक्त एक वर्षाकरीताच साठवणीला असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी हे आपण केलेले कर्मफल त्याना अर्पण करुन पितरांचे पुण्य संचय वाढवू शकतो. 

आपण पुजा अर्चा श्राध्द यांसारखे धार्मिक विधी करण्यापेक्षा श्री अगस्थी मुनीनी सांगितल्या विधीप्रमाणे फक्त ३ मंत्र विधीयुक्त म्हटले तरी त्यातून चांगले कर्मफल तयार होऊन ते पूर्वजांना त्यांचे पुण्य वाढविण्यासाठी व क्षुधा तृत्पीसाठी करू शकतो. तसेच हा विधी कोणीही म्हणजे पुरुष, स्त्रीया व मुलेमुली करु शकतात.  हा विधी फार सोपा आणि साधा आहे. यासाठी तुमच्या घरातील किंवा बालकनीतील एक  कोपरा हवा, जिथं तुम्ही पूर्व दिशेला तोंड करुन बसू शकाल. यासाठी हवे आहे बसायला आसन, १ पेला पाणी, १ छोटी वाटी काळे तीळ, व १ ताम्हण (ताटली). पितरांची नांवे.

या साठी  तुम्ही तुमच्या बालकनीत एका कोपर्‍यात पुर्वेकडे तोंड करुन आसनावर बसा. विधी सुरु करण्यापुर्वी मनातल्यामनांत पूर्ण इच्छेने आणि विचारानी, शब्दानी पुढील संकल्प सोडा.  

जे माझ्या वडिलांच्या कुळातील आहेत, जे माझ्या आईच्या कुळातील आहेत, जे मला माहित असलेले पितर आहेत, जे माझ्या अजाणतेमुळे माहित नसलेले असे पितर आहेत, ज्या पितरांना वारस नाहीत असे, ज्या पितरांना वारस असूनही ते आपल्या पितरांना विसरले आहेत असे, जे माझ्या मित्र परिवारातील पितर झाले असतील असे, व माझे अन्न म्हणून मी व माझ्या परिवारातील सदस्य अन्न खात असताना जाणते अजाणतेने प्राणी मारले जात असतील तर असे आत्मे कृपया तुमचे लक्ष माझ्याकडे द्या. असा संकल्प करावा. यानंतर खालील पितृ गायत्री मंत्र (११ वेळा म्हणणे)

ॐ पितृ गायत्री विद्महे जगत् धारिणे धीमही | तन्नो पित्रो प्रचोदयात् ॥

आता तुम्ही सर्व पितरांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित केले आहे. आता त्याना आवाहन करुन तुम्ही जे त्याना अल्प प्रमाणांत काळे तीळ व पाणी देणार आहात ते ग्रहण करावयास सांगा. पुढील आवाहन मंत्र (३ वेळा म्हणावा)

ॐ आगच्छ अनन्तु मे पितृ ये माम् ग्रहन्ती जलानजलीम् ॥

मी तुम्हाला काळेतीळ व पाणी तुमची क्षुधा व तृषा शांत करण्यासाठी देत आहे, ते ग्रहण करण्यासाठी तुम्हाला बोलावत आहे. असे म्हणून ३ वेळा पितृ मंत्र म्हणावा. मंत्र म्हणत असताना पुढील कृती करावी.

1) उजव्या हातात थोडे काळे तीळ घ्या. 2) पितृ मंत्र म्हणत असताना काळ्या तीळावर पाणी सोडा व ते ताम्हणात पडू द्या. 4) पाणी सोडतांना चारी बोटे आत वळवून अंगठा व तर्जनी (अंगठ्या जवळील बोट) यांच्या मधून पाणी व तीळ ताम्हाणात सोडा. (कधीही समोरच्या बोटावरून समोरच्या बाजूने ताम्हाणांत सोडू नका. जसे आपण आचमन करताना सोडतो तसे सोडू नका.) 4) जेंव्हा तुम्ही तर्जनी व अंगठ्याच्या मधून पाणी व काळे तीळ सोडता तेंव्हा आपसूकच ते दक्षिण दिशेस ताम्हाणात सोडले जात असते. दक्षिण दिशा पितरांसाठीची आहे. म्हणून ते तसेच पडले गेले पाहिजे. पितृ मंत्र पुढील प्रमाणे  

ॐ सर्व पितृ देवाय नम: | तृप्त आमिदम् तीलोधम् वा जलान जलिम तस्मै स्वधा: नम:, तस्मै स्वधा: नम:, तस्मै स्वधा: नम:॥

आता तुम्ही त्या पितरांना विनंती करा की विष्णूलोकाचे द्वार तुमच्यासाठी खुले आहे. तुम्ही विष्णूलोकात जाण्यासाठी प्रस्थान करा. हा विधी शांत करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी व तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी  ११ वेळा गायत्री मंत्र म्हणावा. त्यावेळी तुम्ही डोळ्यांसमोर उभे केलेले दृष्य अदृष्य होईल, निघून जाईल. गायत्री मंत्र पुढील प्रमाणे 

ॐ  भू: भुव: स्व: ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धिमही  धियोयोन: प्रचोदयात |


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने