संजय राऊतांचा दसराही कारागृहातच.

 


गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. मात्र, आजच्या सुनावणीत संजय राऊत यांना दिलासा मिळाला नसून. आता जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

पत्रा चाळीतील 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.  आजच्या निकालामुळे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांचा दसराही कारागृहातच जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने