गुलाम नबी आझाद यांनी ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.

 


जम्मु काश्मीर मधील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. घोषणेच्या वेळी पक्षाच्या ध्वजाचेही आझाद यांच्याकडून अनावरण करण्यात आले आहे जो तीन रंगांचा आहे. भारतीय काँग्रेसमधून सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केले होते.

या वेळी त्यांनी सांगितले “या पक्षात कुठलाही भेदभाव नसेल. पक्षावर कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा प्रभाव नसेल. सर्व धर्मीयांना या पक्षात प्रवेश करण्याची मुभा असेल”  पक्षाच्या ध्वजाचे रंग सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि शांतीचे प्रतिक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून पक्षासाठी एक हजार पेक्षा जास्त  नावं सुचवण्यात आल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. परंतु पक्षाचे नाव धर्म आणि संस्कृतीनुसार ठेवण्यात आल्याचे आझाद यांनी सांगितले आहे. त्यानुसार ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ हे नाव ठेवण्यात आले आहे”.

दरम्यान काही काळ जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने