ज्यांचं अवघं आयुष्य बारामती शहराच्या अवतीभवती फिरत आलं म्हणत प्रदेश भाजपचा शरद पवारांवर पलटवार



ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार  हे साहजिक आहे. असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये केलं होत. यावर  पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलं आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. 
          
 शरद पवार यांनी गुरुवारी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी मोदी मदत करणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. “पंतप्रधान या प्रकरणात मदत करणार असल्याची माहिती मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे. पण या प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ, हे लहान मुलाची समजूत काढावी असे आहे. त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. त्यामुळे यावर चर्चा न केलेली बरी,” असं पवार म्हणाले. पुढे पवार यांनी, “साधारणत: केंद्रात पक्ष सत्तेत असल्याचे परिणाम काही राज्यांना अनुकूल होत असतात. त्यामध्ये गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण तक्रार करण्याचे कारण नाही,” असंही म्हटलं.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने